मराठी समाजसेवक बोलताच  मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांच नाव डोळ्यासमोर आले नाही असे होणारच नाही.
बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४ रोजी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या.
डॉक्टरकीची पदवी असून सुद्धा वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली.
पुढे  कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवांच्या सेवेत घालवले।
याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. बाबा आमटे यांना हे आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.
बाबा आमटे यांनी अनेक आश्रम आणि प्रकल्प सुरू केले . आनंदवन
लोकबिरादरी प्रकल्प हा सर्वात प्रसिद्ध प्रकल्प आणि काम म्हणून ओळखला जातो.
बाबा आमटे आनंदवन म्हणजे असंख्य मनांना उभारी देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारी सेवाभावी संस्था आहे.
त्यांचा याच कार्य आणि मानवतेच्या सेवे मुळे अनेक पुरस्कार आणि बक्षिसाने गौरव करण्यात आला.
पुढे त्यांचा पत्नी साधना आमटे सह असेच अनेक प्रकल्प आणि जनसेवेच कार्य चालू ठेवले।
अशा या मानवाच्या रूपातील जनसेवाक आणि ऐक आदर्श व्यक्तिमत्त्वला मनाचा मुजरा ........