🙏 *नमस्कार भावांनो, मित्रांनो* *(खासकरुन 16 ते 25 वयोगटातील)*

       
*आजकाल भांडण , मारामारया, वाढदिवस , स्टंटबाजी याची क्रेज खुप वाढली आहे.यातुन प्रत्येक जण आपले वर्चस्व सिद्ध करु पाहतोय. चार जण आपल्या मागुन आले की मी कोणीतरी भाई झालो असे प्रत्येकाला वाटतय. खरतर याचा काहीच उपयोग नाही.*
*तुम्हाला वर्चस्वच दाखवायचे असेल तर योग्य कामात ,योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी दाखवा. ज्याला एक वेळ पोटाला अन्न मिळायची पंचायत तो सुद्धा स्वतःला कोणतरी मोठा समजत असतो. आग लावणारे राहतात बाजुलाच. भोगायला लागते तुम्हा आम्हासारख्या गरीब ,सर्वसामान्य लोकांना.*

*व्यसनाच्या आहारी जाऊन. कोणालातरी मोठ करून त्याचे तळवे चाटण्यापेक्षा ,शिकुन चार पैशाची नोकरी करून आपल्या कुंटूंबाला सांभाळा. या ठिकाणी मी कोणाचे समर्थन करत नाही किंवा कोणाच्या विरुद्धही बोलत नाही.*
   
*विचार परखड आहेत पण सत्य आहेत.*