Uri: The Surgical Strike

उरी चित्रपटाचे पहिले ट्रेलर झळकले तेव्हा सोशल मीडियामध्ये 'द वायर' या वेबसाईट ने चित्रपटाची खिल्ली उडवताना लिहिले होते "Uri Trailer: Brace Yourselves, More Toxic Hyper-Nationalism is Coming".
त्या फडतूस डाव्या वेबसाईट ने जे काही लिहिले होते त्यावरून एक निश्चित समजले होते कि "ज्या अर्थी त्यांना उरी चा ट्रेलर आवडला नाही, त्या अर्थी हा चित्रपट देशभक्ती जागवणारा उत्तम चित्रपट असणारच."

माझ्या मते बॉर्डर नंतर उरी हा पहिला भारतीय सेनेवर आधारित चित्रपट असेल जो थिएटर मध्ये प्रेक्षकांना नकळत घोषणा द्यायला, टाळ्या वाजवायला भाग पाडतो. काल रात्री शेवटचा ११ वाजेचा 'भारत माता कि जय' सारख्या घोषणांनी दणाणून सोडणारा हाऊसफुल शो मी स्वतः अनुभवाला.

उरी चित्रपटामुळे २०१९ ची सुरुवात धमाकेदार झाली आहे, यात वादच नाही.

उरी चा लेखक, दिग्दर्शक आदित्य धर कोण आहे मला माहीत नाही; संगीतकार शाश्वत सचदेव कोण आहे मला माहीत नाही आणि सिनेमॅटोग्राफर मितेश मिरचंदानी सुद्धा माहीत नाही. या तिघांनी हा चित्रपट ज्या पद्धतीने बनवलाय त्याला शब्दात मांडणे कठीण आहे. नाईट व्हिजन गॉगल्स, स्नायपर गन्स, आधुनिक ड्रोन कॅमेरा इ. युद्धात असणाऱ्या अनेक गोष्टींची मांडणी अतिशय वास्तव आहे.
युद्धभूमीवर विनाकारण, ओढून ताणून आरडाओरड आणि फिल्मी स्टाईल फायटिंग चे सीन उरी चित्रपटात नाहीये आणि त्याला प्रेक्षक पूर्णपणे स्वीकारतात.

विकी कौशल ने मेजर विहान ची प्रमुख भूमिका ज्या प्रकारे साकारली आहे त्याला तोड च नाही. प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतील अशा जोरदार आवाजातील त्याच्या घोषणा पुन्हा पुनः ऐकत राहाव्याश्या वाटतात. ट्रेलर मध्ये दिसणारा तो '७२ हूर' वाला सीन सेन्सर बोर्डाने बहुतेक छाटला आहे. जे सत्य आहे ते सीन का छाटले जातात? 😡

शत्रूच्या गोटात स्वतः घुसायचे आहे; तिथून जिवंत परतणार कि नाही याची काहीही शाश्वती नसताना अशा मोहिमेवर जाण्यास किती पराकोटीचे धाडस लागत असेल, याची आपण एक सामान्य नागरिक कल्पना सुद्धा करू शकत नाही. 💪💪

पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून आपल्या जवानांनी जे अशक्यप्राय शौर्य गाजवले ते बघायचे असेल तर हा चित्रपट नक्की बघा. वायर सारख्या प्रेस्टिट्यूट च्या व्याख्येप्रमाणे जर तुम्ही Hyper-Nationalist असाल तर हा चित्रपट नक्की बघा. तुम्हाला 'भारत माता कि जय' हा जयघोष चित्रपटगृहात ऐकायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघा. तुम्ही मोदी सरकारचे समर्थक असो किंवा विरोधक, तरीही केवळ आपल्या शूरवीर जवानांसाठी हा चित्रपट बघा.  🇮🇳
तुम्ही जर संजू चित्रपट बघून रडले असाल आणि क्षणभर जरी तुम्हाला ती 'भारत तेरे तुकडे होंगे' म्हणणारी गॅंग आवडली असेल तर माफ करा - उरी हा चित्रपट तुमच्यासाठी नाही. आणि बघितलाच तर खूप त्रास होण्याची शक्यता आहे.

२०१६ मध्ये झालेल्या या सर्जिकल स्ट्राईकवर आणि या चित्रपटावर काही समीक्षा आणि काही बातम्यांमध्ये  "या घटनेचे एवढे स्तुती कथन, एवढे जास्त ग्लोरिफिकेशन कशासाठी?" हा प्रश्न विचारला जातोय.
आम्ही म्हणतोय ग्लोरिफिकेशन सत्य घटनेचे नाही तर काय काल्पनिक ऍवेन्जर्स चे करू काय? आपल्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या पराक्रमांचे ग्लोरिफिकेशन व्हायलाच हवे.

तर मग full on High Josh ने उरी हा चित्रपट सहकुटुंब बघाच.