आई या शब्दाचा अर्थ कवितांमध्ये व्यक्त केला आहे फक्त तुमच्या साठी | poem’s on mother in marathi. | आईवर काही सुंदर कविता

आई

हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले …
आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,
दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,
पिठामंदी….. पिठामंदी
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय …
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..
रे हंबरून वासराले…
कण्या काट्या वेचायला माय जाइ राणी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी,
काट्या कुट्या ……रं काट्या कुट्या
काट्याकुट्यालाही तीचं मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय…
रे हंबरून वासराले…
बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमन,
बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती काम,
आग शिकून शान …..ग शिकून शान…..
शिकून शान कुठ मोठा मास्तर व्हनार हायं…
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय…..
रे हंबरून वासराले…..
दारू पिवून मायेला मारी जवा माझा बाप,
थरथर कापे अन, लागे तीले धाप,
कसा ह्याच्या …….रं कसा ह्याच्या….
कसाह्याच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय…..
रे हंबरून वासराले…
नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी,
न भरल्या डोळ्यान …………न भरल्या डोळ्यान,
भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावर् चि सायं,
तवा मले दुधामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय……….
रे हंबरून वासराले….
गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा ग माये तुझ्या पोटी,
तुझ्या चरणी……गं तुझ्या चरणी,
तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय,
तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय……….
हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले…..
– कवी नारायण सुर्वे

Read More : प्रेरणादायी कविता 👈वाचण्यासाठी यावर क्लिक करा..
Read More : आईवर काही सुंदर कविता

माझी आई

जेव्हा तारे विझू लागत
उंच भोंगे वाजू लागत
पोंग्याच्या दिशेने वळत
रोज दिंड्या जात चालत
झपाझप उचलीत पाय
मागे वळून बघीत जाय
ममतेने जाई सांगत
नका बसू कुणाशी भांडत
वर दोन पैसे मिळत.
दसऱ्याच्या आदल्या दिनी
जाई पाचांसह घेऊनी
फिरू आम्ही आरास बघत
साऱ्या खात्यांतून हुंदडत
किती मजा म्हणून सांगू
शब्दासाठे झालेत पंगू
भिंगऱ्या पेपेटे घेऊन
फुग्यांचे पतंग झोकून
जात असू पक्षी होऊन.
एक दिवस काय झाले
तिला गाडीतून आणले
होते तिचे उघडे डोळे
तोंडातून रक्त भळभळे
जोडीवालीण तिची साळू
जवळ घेत म्हणाली बाळू
मिटीमिटी पाहात होतो
माझे छत्र शोधीत होतो
आम्ही आई शोधीत होतो.
त्याच रात्री आम्ही पांचानी
एकमेकास बिलगूनी
आईची मायाच समजून
घेतली चादर ओढून
आधीचे नव्हतेच काही
आता आई देखील नाही
अश्रूंना घालीत अडसर
जागत होतो रात्रभर
झालो पुरते कलंदर.

– कवी नारायण सुर्वे

आई.. 

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असे जवळ – तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
असेल – आहे – असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई