प्रेम करावे तर असे...💓

        मी तिला शोधत होते, ती आज दिसलीचं नाही. ती कॉलेजलाच आली नव्हती, कारण कुणालाचं माहित नव्हतं.! सारे आपापसात कुजबुजत होते. स्पष्ट कुणीही बोलतं नव्हते...! हो ती अतिशय हुशार अभ्यासात आणि कला गुणातही.. सौंदर्य अतिशय सोज्वळ, सडपातळ गोरी अतिशय देखणी राहणीमान अतिशय साधे, आजच्या युगाला न पटणारे तरीही आकर्षक कुणीही प्रेमात पडावे अशी..! नाव तिचं "राजश्री" आम्ही तिला" राज" म्हणायचो..." राज" म्हणजे "गाणं"...! ही तिची ओळखं गाणं हे तिचं वेड गाण्यासाठी ती वेडी होती.

तिच्या गळ्यात जणू कोकिळेचा वास होता.. ती गायला लागली कि सारे मंत्रमुग्ध झालेचं समजा.. त्यातली मी पण एक. मी पहिल्यांदा तिचं गाणं ऐकलं. "जीवलगा राहिले दूर घर माझे आणि मी तिच्या प्रेमात पडले ती आजपर्यंत.. पण हे की आज ती कॉलेजमध्ये नाही, tution मध्येही नाही, घरीपण नाही आणि कुणी काही सांगतही नाही. तेवढ्यात आमची एक मैत्रीण समोरून येताना दिसली. मी धावतचं. जाऊन विचारले,
अगं राज कुठे आहे..? कुठे दिसत नाही...! 


        ती रडतचं बोलली हॉस्पिटल मध्ये भर्ती आहे.... 
मला अचानक काही सुचेनासं झालं, कालपर्यंत जी धडधाकट मुलगी माझ्यासोबत होती ती अचानक हॉस्पिटल मध्ये.
तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्यात.. ( ती पुढे बोलू लागली. )
माझ्या पायाखालची जमीन सरकली. राजसारखी सहनशील मुलगी असं काही करू शकते..? विश्वासच बसत नव्हता, मग अचानक काय झालं..? ती कुणाजवळ काही बोलत नव्हती पण एकदा बोलताबोलता तिने माझ्या जवळ आपलं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला.. ती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती. 
     
    तो तिच्या क्लासचा नव्हता पण कॉलेजचा होता. एक वर्ग समोर होता पण क्षेत्र एकच होतं.. ती बऱ्याच कार्यक्रमात गायची प्रत्येक स्पर्धा कॉलेजचे प्रोग्राम राजशिवाय अधुरे असायचे. गाण्यासाठी साथीला वादक लागयचे आणि अशातच त्याची ओळखं झाली. तो वादक होता, प्रत्येक वाद्य मोठ्या शिताफीने वाजवण्याची कला त्याला अवगत होती. त्याला सगळे allroundar म्हणायचे. बऱ्याच कार्यक्रमात वेगवेगळ्या गायिका, गायक सोबत वाजवायचा. पण राजचं गाणं तो अतिशय जीव लावून वाजवायचा कारण ती गायचीच भन्नाट. तिचं गाणं नेहमी भावपूर्ण व त्याला आवडणारं असायचं.
     
         तो अतिशय लोकप्रिय आणि खूप हुशार ड्रमर होता. मुली पटकन त्याच्यावर इम्प्रेस व्हायच्या. या साऱ्या गोष्टींचा त्याला खूप घमंड होता. तो खूप गर्विष्ट होता हे त्याचा वागण्यातून जाणवायचं.. हे तिलाही माहित होतं. पण म्हणतात ना मना समोर कुणाचं चालत नसतं...! नाव त्याचं विशाल मन अगदी अविशाल उद्धट, गर्विष्ट, चिडचिडा असा त्याचा स्वभाव.. दिसायला मात्र एकदम आकर्षक एकदा कुणी पहावं आणि प्रेमातच पडावं असा.. म्हणतात ना की प्रेम आंधळ असतं पण ही तर पूर्णतः अपंगच झाली त्याचा प्रेमात "वेडी"
जसजशी त्याची ओळखं वाढत गेली, तसतशी हिची ओढही वाढत गेली, बाहेर गावी बरेचदा कार्यक्रमाला मिळून जायचे. बाकी युनिट पण असायचे सोबत ही मात्र याची काळजी घेण्यात मग्न असायची. "विशाल म्हणजे माझं जीवन" असं ती म्हणायाची..
तो जेवला कि नाही.. त्याला बरं वाटतं कि नाही.. त्याला काय पाहिजे काय नाही..? ह्या सगळ्या गोष्टीची काळजी तीच करायची. पण त्याला हे सारं आवडायचं नाही म्हणायचा "रीआज कर" उगाच वेळ घालू नको " तिच्या डोळ्यातला त्याच्यासाठी असणारे प्रेम सर्वांना दिसायचे....पण..! हा तर पाषाण याला कधी पाझारच फुटलं नाही. कित्येकदा तिच्यावर चिडायचा पण ही मात्र प्रेमदिवानी कधी उलट उत्तरही देत नसे. तिचं मन कित्येकदा दुखावला जाई. ती कधीही बोलून दाखवत नसे. दु:खाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून येई. राजने नेहमी विशाल वर निर्मळ निस्वार्थी कशाचीही अपेक्षा न ठेवता प्रेम केलं. देनं...देनं...आणि देनच प्रेम असू शकतं. असं ती म्हणायची. एकदा तरी माझं प्रेम या पाषाणाला पाझर फोडेल या आशेने ती नेहमी त्याच्यावर प्रेम करीत राहिली अचानक तिला समजलं तो नेहमीसाठी शहर सोडून बाहेरगावी चालला खूप रात्र झाली होती. ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली.. पूर्ण रात्र रडून काढली तिने त्याच्यापासून दूर...? हि कल्पनाही सहन करू शकली नाही एकदाची सकाळ झाली ती कॉलेजला आली डोळे सुजलेलेच दिसत होते.. काय झाले ? विचारण्याच्या आतचं ती कुणाला तरी शोधत पुढे निघून गेली.. माझ्या लक्षात आले ती विशालला शोधत होती तेवढ्यात तो समोरून येताना दिसला.. "थांब विशाल मला काही बोलायचं आहे, तुझ्याशी तुझ्या आयुष्यातला फक्त काही वेळ दे मला आज" ती बोलली, डोळे पाणावलेले होते, "मला सोडून जाऊ नको रे..”

       मी खूप प्रेम करते तुझ्यावर.. जीवापाड...! मी कोणतेही कष्ट करेन तू म्हणशील ते करेन..! पण मला सोडून जाऊ नको रे मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय.. मला समजून घे माझ्या प्रेमाला..! माझ्या मनाला..! समजून घे " एका श्वासात तिने आपल्या मनातील लाव्हा खाली केल्या आणि तो मात्र स्तब्ध, शांत त्याला काही सुचेनासं झालं. तो शांत स्वरात बोलू लागला "हे बघ राज मी तुझ्या भावना समजू शकतो.. मला तुला दुखवायचं नव्हतं पण मी तुझ्याकडे या नजरेने पाहूचं शकत नाही... प्रेम करणे तर दूरचं विचारही करू शकत नाही... अगं वेडे...! कारण प्रेम एकदाच केलं जातं आणि ते मी करून, चुकलोय आणि मला तिच्याशी प्रामाणिक राहायचं आहे.. खूप दूर आहे माझ्यापासून तरीही...!
तू खूप गुणी, खूप चांगली मुलगी आहेस, हुशार आहेस..! तुझ्याजवळ देवाने दिलेली अनमोल भेट आहे.. तुझा आवाज तुझं गाणं...! आपल्या कलेचं चीज कर आपलं आयुष्य सुंदर घडंव! हा विचार डोक्यातून काढून टाक तू मला समजून घे व मला माफ कर. एवढं बोलून तो तेथून निघून गेला तो नेहमीसाठीच.

Read More :  Marathi quotes on love



हि वेडी हो वेडीच त्याचा शब्दातला अर्थ समजू शकली नाही आणि एक निर्णय घेतला मनाशीच आणि आज ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती.. असं वाटत होतं कुणी आयुष्यातून गेला म्हणून आयुष्य संपते काय विचारावं..? पण कोणत्याही प्रश्नाचा उत्तर ती देऊ शकत नव्हती कारण आज तिचं एक प्रश्न बनून बसली होती तिला बघतच ओक्साबोक्शी रडावसं वाटलं. कसंतरी मन आवरून बाहेर आले.. 
       काही दिवसांनी तिची प्रकृतीत सुधारणा झाली रीआज पूर्ण बंद झालं होता गाणं गाने तर दूर एकातही नव्हती.. पाषाण मूर्ती बनली जणू..! काहीतरी शून्यात शोधत असायची कितीतरी वेळ बाहेर पाळण्यावर बसून. एक मात्र आजही कुणालाच माहित नाही माझाशिवाय की तिने झोपेच्या गोळ्या का खाल्यात..? परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे तिने असं केलं साऱ्यांनाच वाटतं. मी पण तिला नको बोलू कुणाजवळ असं वचन घेतलं. आता बरीच महिने झालीत ती बऱ्यापैकी नॉर्मल आहे रीआज सुरु केलं.. गाणं सुरु केलं. राज स्वत:ला सावरायला शिकली आता. आजही ती गाणं गाताना तिच्या गळ्यातून एक वेदनेची लहर येते.. आज तिच्या चंचल, रोमांटिक गाण्याची जागा संथ, दर्दी... हृदयस्पर्शी गाण्यांनी घेतली आहे. गाताना आजही ती त्याला वादकाच्या जागी शोधते.. पण, तो तेथे नसतो तिच्या, चेहऱ्यावर गाताना नेहमी एक गोड स्मित असतं पण, त्याच्या मागचं दु:ख माझ्याशिवाय जास्त कुणाला कळणार.. "राज" ला जेव्हा जेव्हा मी गाताना पाहते माझे डोळे आपोआपचं पाणावतात आणि मनातून शब्द ओठांवर येतात "प्रेम करावं तर राज सारखे ...



एक हृदयस्पर्शी प्रेमकथाः..... ♥

शालीनी आणि महादेव यांचं चार वर्षाँपासुन एकमेकांवर खुप प्रेम
आहे...

ते एकमेकांना चांगल्याप्रकारे समजुन घेतात...

त्यांच्या प्रेमाबद्दल महादेवच्या घरच्यांनाही माहीती आहे,त्यांची या
लग्नाला संमती तर आहे,पण, महादेवच्या वडीलांना शालीनी
फारशी पसंत नाही....

महादेवच्या वडीलांना हाय ब्लडप्रेशरचा
त्रास आहे,एक दिवस घरात कोणीही नसताना, महादेवच्या
वडीलांना हार्ट अटॅकचा जोराचा झटका आला....

सुदैवानेत्यावेळी शालीनी तिथे पोहोचली,त्याच्या वडीलांची ही
अवस्था पाहुन ती ही थोडी बिथरली....

तिने लगेच महादेवला फोन केला आणि वडीलांच्या अवस्थेबद्दल सांगु लागली पण,त्याचे
वडील जोरजोरात ओरडु लागले,त्याच ओरडण्याने घाबरुन
शालीनीच्या हातचा मोबाईल खाली पडला...

शालीनीचं बोलणं बंद झाल्याने वडीलांच्या अशा अवस्थेमुळे इकडे महादेवला
काळजीलागली होती,तो तडख घरी निघाला....

जेव्हा तो घरी
पोहोचला तेव्हा त्यांच्या वडीलांचा अंत झाला होता,सर्व
शेजारी,आई आणि शालीनीही तेथेच होती....

महादेव वडीलांच्या
शोकात पुर्णपणे बुडून गेला,काही वेळानंतर त्यांच्यावर
अंत्यसंस्कार करण्यात आले....

काही दिवसांनंतर
शालीनीचं महादेवला भेटणं पुर्णपणे कमी झालं होतं...

तिचा त्याच्याविषयीचा दृष्टीकोन बदलुलागला होता,आणि एक
दिवस ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली,मी आता इथुन पुढे तुला भेटु नाही शकणार,आणि तु ही मला भेटण्याचा प्रयत्न करु
नकोस...

माझं दुसर्या एका मुलावर प्रेम बसलंय,आणि आम्ही
लवकरच लग्न करणार आहोत,by...!

शालीनी हे बोलताना तिच्या डोळ्यात वेगळ्याच प्रकारचे
भाव होते महादेवला हे कळतंच नव्हतं की ती असं का बोलतीये पण
तिच्या या बोलण्याने त्याचं हिरवंगार जग मात्र उजाडलं गेलं
होतं....

असं अचानक चार वर्षाचे नातेसंबंध तोडले गेल्यामुळे तो
खुपच दुखावला गेला होता,तिच्या जाणार्या त्या
पाठमोर्या सावलीकडे तो भरलेल्या डोळ्यांनी एकटक बघतच
राहील होता... ♥

काही दिवसांनी तो शालीनीचा तिरस्कार करु
लागला,तिच्या सगळ्या भेटवस्तु तो जाळु लागला,तिला
मनापासुन विसरण्याचा प्रयत्न करु लागला,तिला आठवणींतुन
पुसु लागला,आणि एक दिवस खरंच शालीनीच्या आठवणींना
त्याने मनाच्या एका कोपर्यात दफनकेलं.
तो स्वतःच्या कामात बिझी झाला....

छोट्या छोट्या
गोष्टीँमध्ये समाधान शोधु लागला.....
सहा महीन्यांनंतर
महादेव असाच आपल्या मोबाईलशी छेडछाडकरत बसला
होता....

आता तो एक यशस्वी बिझनसमन होता,मोबाईलमध्ये असणारे जुनेच call recordings ऐकत बसला होता....

तेवढ्यात
त्याला शालीनीच्या एका कॉलचं recording मिळालं.... ♥

ते
त्याच्या वडीलांच्या मृत्युवेळच्या कॉलचं होतं,ते त्याने
व्यवस्थित ऐकल्यावर त्याला एक जबरदस्त धक्काच
बसला,कारण ज्यावेळी शालीनीच्या हातुन तिचा फोन
खाली पडला होता त्यावेळि तो चालुच होता,आणि तो
कॉल रेकॉर्ड झाला होता,त्यामध्येस्पष्ट ऐकु येत होतं की
महादेवच्या वडीलांनी त्यांचा शेवटचा श्वास सोडतेवेळी
शालीनीकडुन महादेवपासुन दुर जायचं वचन घेतलं होतं... ♥

हे ऐकताच
त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली...

तो आहे त्या
जागेवरुनखाडकन उभा झाला आणि शालीनीच्या घरी
गेला....

घराला कुलुप होतं..... ♥

शेजारुन जाणार्या पादचार्याला
त्याने याविषयी विचारलं,त्या पादचार्याने सांगितलं
की,अहो तिने तर याच घरातसहा महीन्यांपुर्वीच गळफास
लावुन आत्महत्या केली.... ♥

पोलीसांनाही तिच्या आत्महत्येचं
कारण कळलं नाही,पण कदाचित तिने जीवनाला कंटाळुन
आत्महत्या केली असावी.... ♥

हे ऐकताच महादेवचं दुःख उराशी दाटलं,या बोलण्याने तर त्याचं
आभाळच लुटलं,चार दिवस प्रेमाचे गायले,पण तिनेच मृत्युला
गाठलं,,
खरंच तिने दिलेल्या त्यागाला परीसीमा नव्हती याची
जाणीव महादेवलाझाली आणि, महादेव तिच्या आठवणीत,तिच्या
दाराशी अश्रु ढाळतबसला आणि जोरजोरात रडु लागला.......




खरं प्रेम नक्की काय असतं...💘💗

ती म्हणाली, "माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझं देखील प्रेम आहे माझ्यावर पण ह्याने कसं कळेल आपलं प्रेम खरं आहे ते सांगशील का रे मला खरं प्रेम नक्की असतं तरी काय?”

तो म्हणाला, "खरं प्रेम ओळखणं खूप सोपं आहे.”

ती म्हणाली, "कसं काय रे ?”


     तो तिला म्हणाला, "विचार तुझ्या हृदयाला, जो नेहमी माझ्यासाठी धडकत असतो. विचार तुझ्या डोळ्यांना, जे नेहमी मला बघण्यासाठी उत्सुक असतात आणि जेव्हा मी तुझ्यासमोर नसलो कि मला शोधत असतात. विचार तुझ्या अश्रूंना, जे माझ्या आठवणीत तुझ्या डोळ्यातनं गळत असतात. विचार तुझ्या त्या डोळ्यातल्या अश्रूंना, गळतात तुझ्या डोळ्यातनं पण दिसून येतात माझ्या डोळ्यांमध्ये. विचार तुझ्या त्या हास्याला, जे मी तुझ्या सोबत असताना तुझ्या चेहऱ्यावर दिसून येतात. विचार तुझ्या त्या दु:ख सुखातल्या क्षणांना, जे माझ्यासोबत वाटले होते. विचार तुझ्या त्या मनाला, जेव्हा तुला पहिल्यांदा वाटलं तुझं माझ्यावर प्रेम आहे. विचार तुझ्या त्याच मनाला, जो नेहमी माझाच विचार करत असतो आणि प्रेम हे मनापासून नजरेत उतरलं पाहिजे, नजरेतून मनात नाही. प्रेमाला नजरेची गरज नसते कारण ते मनच असतं जे आपल्याला सांगून देतं.” 

    खरं प्रेम नक्की काय असतं ते, हे सर्व ऐकून तिच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि ती त्याला आपल्या मिठीत घेऊन घट्ट पकडते कधी न सोडण्यासाठी.

💚💙❤💜💛